गोट्यांच्या खेळाचे प्रकार | गावाकडचा गोट्यांचा खेळ | Gotya Kashya Khelatat? Marathi

Gotya Kashya Khelatat? Marathi गोट्यांच्या खेळाचे प्रकार , गावाकडचा गोट्यांचा खेळ.

Gotya Kashya Khelatat? Marathi
गावाकडचा गोट्यांचा खेळ


मित्रांनो आजकाल मोबाईल, लॅपटॉप आणि टीव्ही मुळे मैदानी खेळ कमी होत चालले आहेत. लहान मुलांपासून मोठयांपर्यंत सगळे सोशल मीडिया आणि मोबाईल वरील गेम्स ह्यात बिझी झाले आहेत. लहान मुलं तर आजकाल जेवताना सुद्धा मोबाईल असेल तर जेवतात. त्यामुळे गावाकडील जुने खेळ आणि त्याचे महत्त्व आजकालच्या नवीन पिढीला समजणे खूपच कठीण आहे.'Gotya Kashya Khelatat? Marathi'

मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावाकडचे जुने खेळ माहीत आहेत का? लहानपणी तुम्ही कोणते खेळ खेळले आहेत?

आज आपण असाच एक गावातला खेळाविषयी थोडी माहिती समजून घेणार आहोत.

गोट्यांचा खेळ! तुम्हाला माहित आहे का गोट्यांचा खेळ किती प्रकारे खेळला जातो.लहानपणी तुम्ही कोणता प्रकार खेळायचे हे कॉमेंट मध्ये सांगायला विसरू नका.

तर गावाकडे गोट्या हा खेळ खूप गमतीचा खेळ आहे, ह्यामध्ये असणारे प्रकार तर खूपच मज्जेचे आहेत.

Gotya Kashya Khelatat? Marathi 

गोट्या खेळाचे अनेक प्रकार आहेत त्यातला आज एक प्रकार आता आपण बघणार आहोत.

गोटी खेळाचा प्रकार - 

१०-२०-३० (दाहा-वीस-तीस)

हा प्रकार कसा खेळायचा हे आपण आता बघुया.
ह्या खेळात कितीही जण सहाबाग घेऊ शकतात. प्रथम एका स्वच्छ जागी एक ४"-५" इंच असा खड्डा खोदला जातो, त्याला गद असे म्हटले जाते. त्या गदी पासून १० ते १५ पावलांच्या अंतरावर एक सीमा रेषा मारून सहाबाग घेतलेल्या सर्व मुलांनी सीमा रेषेच्या बाहेरून आपली गोटी गदी जवळ फेकायची असते. त्याला गोटी चकणे असे म्हणतात. सर्व जण चकल्यानंतर ज्याची गोटी ही गदी पासून खूप जवळ असेल त्याच्या पहिला डाव असतो. आणि ज्याची सर्वात लांब अंतरावर गोटी असेल तो सर्वात शेवटी डाव घेणार असा निमन असतो.'gotya khel in marathi'

ज्याच्या पहिला डाव असतो त्याने आपली गोटी हो घेऊन गदी मध्ये टाकायचा प्रयत्न करायचा असतो.. जर त्याची गोटी पहिल्याच डावात गदित जाते तर त्याला गद भरणे असे म्हणतात आणि  १० ची गद भरली असे म्हटले जाते. त्यानंतर त्याने गादीतून आपली जवळ ज्याची गोटी असेल त्याला नेम धरून मारायचे असते, त्याला टोला मारणे असे म्हणतात. १० ची गद भरल्यानंतर २० चा टोला असतो. नंतर पून्हा ३० ची गद असते, असे करून १०० चा टोला ज्याच्या आधी पूर्ण होतो तो सुटला किंवा झुटला असे म्हणतात. त्यानंतर उरलेल्या सर्व मुलांनी पुन्हा सीमा रेषेच्या इथून गोटी चकायची असते त्यानंतर पुन्हा अधीसारखेच करून डाव खेळायचा असतो, प्रत्येक फेरीत फक्ट एक जण झुटतो. असे करत करत शेवटच्या दोन मुलांमधे जो एक जण हरतो त्याच्यावर राज दिली जाते.
त्यानंतर राज्य आलेल्या मुलाला आपली गोटी सीमा रेषेच्या बाहेर ठेवायला संगतली जाते आणि झुटलेले सगळे जण गदी जवळून पुन्हा सीमा रेषेवर त्याच्या गोटी जवळ चकतात आणि त्याच्या गोटीला मारतात. गोटी वर मारल्यानंतर राज्य आलेल्या मुलाला पुन्हा ३ मोठी टेंग (३ मोठी पाऊले) घ्यायला बोलतात आणि तिसऱ्या टेंगावर पुन्हा गोटी ठेवायला बोलतात, पुन्हा सगळे जण मागील बाजूने चकुन पुन्हा त्याच्या गोटी वर निशाणा घेतात. असे करत करत त्या मुलाला खूप लांब नेतात जोपर्यंत सर्व जणांचा नेम चुकत नाही तोपर्यंत त्याला टेंग घेत फिरवले जाते आणि शेवटी राज्य आलेल्या मुलाला जिथून जिथून तो टेंग घेत गेला होता तेथून एका पायावर लंगडी घेत यायचे असते आणि सर्व जण त्याची टिंगल करत असतात.'gotya khel in marathi'

असा हा एक गावाकडचा गोट्यांच्या खेळाचा प्रकार आहे.

मित्रांनो तुम्हाला हा खेळ"Gotya Kashya Khelatat? Marathi'कसा वाटला हे कॉमेंट मध्ये सांगा आणि तुमच्या मित्राला शेअर करायला विसरू नका.

धन्यवाद.


Post a Comment

0 Comments