Akara Maruti in Maharashtra Marathi महाराष्ट्रतील ११ मारुती मंदिर , रामदास स्वामी स्थापित अकरा मारुती.
![]() |
Akara Maruti in Maharashtra Marathi |
समर्थ रामदास स्वामींनी केलेली स्थापना Ramadas Swami Sthapit Akara Maruti
समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रतील सातारा, कऱ्हाड आणि कोल्हापूर या परिसरात ११ ठिकाणी हनुमान मंदिराची स्थापना केली.'Akara Maruti in Maharashtra Marathi'
Akara Maruti in Maharashtra Marathi
महाराष्ट्रतील चाफळ यथे दोन मारुतीच्या स्थापना आहेत. सातारा कऱ्हाड चिपळूण कडून जाणाऱ्या फाट्याजवळ उंब्रज गावाजवळ चाफळ येथे ही दोन देवळ आहेत.
१) वीर मारुती २) प्रताप मारुती -
रामाच्या देवळासमोर हात जोडून उभा असलेला दास मारुती म्हणजेच वीर मारूती आणि त्याच देवळाच्या मागे प्रताप मारुती आहे. कृष्णा नदीच्या काठावर चुना, वाळू आणि ताग पासून बनवलेली ६ फूट उंच मूर्ती स्थापन केली आहे. ही मूर्ती रामाच्या समोर उभी असून रामाच्या चरणाकडे नेत्र स्थिर असल्याच्या भास होतो. त्याच मंदिराच्या मागे असलेला प्रताप मारूती हे मंदिर समर्थांनी बांधले असल्याची आख्यायिका आहे. देवळातली मुर्ती ही भीमरूपी या स्तोत्रात वर्णन केलेल्या मारुती सारखी आहे. या दोन्ही मूर्तींची स्थापना समर्थांनी केली असुन त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे.
३) मजगावचा मारुती -
चाफळ पासून ३ किमी अंतरावर एक गावात पाषाणाच्या स्वरूपात असलेल्या दगडाला समर्थांनी मारुतीचे रूप दिले. ५ फूटाची ही मुर्ती चाफळ च्या राम मंदिराकडे तोंड करून उभारलेली आहे.
४)शिंगणवाडीचा मारुती -
या मारुतीला खडीचा मारुती किंवा बाळ मारुती व चाफळ चा तिसरा मारुती असे देखिल म्हटले जाते. शिंगणवाडी ची टेकडी चाफळ पासून १ किमी अंतरावर आहे. ही मुर्ती उत्तरेकडे तोंड करून उभी आहे. अकरा मारुती देवळात हे सर्वात लहान देऊळ आहे.
५) उंब्रज मारुती -
ह्या मारुतीला मठातला मारुती असे म्हंटले जाते. चाफळ चे दोन आणि मजगावातील एक मारुतीचे दर्शन करून परत उंब्रज ला आल्यावर येथे जवळच तीन मारुती आहेत त्यातील एक हा उंब्रज चा मठातील मारुती आहे.
६) मसूर चा मारुती -
उंब्रज पासून १० किमी अंतरावर असलेल्या मसूर येथे मारुतीची स्थापना केलेली आहे. चून्यापासून ५ फूट उंच अशी ही मारुतीची मुर्ती पूर्वाभिमुखी आहे. मुर्तीच्या एका बाजूला शिवराम आणि दुसऱ्या बाजूला समर्थांचे चित्र काढलेले आहे.
७) शिराळ्याचा मारुती -
सांगली जिल्ह्यांतील नागासाठी प्रसिद्ध असलेल्या शिराळ गावाच्या बस स्थानकाजवळ हे मंदिर आहे. येथील मुर्ती ही ७ फूट उंच अशी चून्यापासून बनवलेली आहे. ही मुर्ती उत्तराभिमुखी आहे. मुर्तीच्या मस्तकाच्या उजव्या आणि डाव्या बाजूला झरोखे आहेत त्यातून सूर्योदय आणि सूर्यास्त च्या वेळी मुर्तीच्या मुखावर थेट प्रकाश पडतो.
८) शाहापुर चा मारुती -
कऱ्हाड मसूर च्या रस्त्यापासून १५ किमी अंतरावर शहापूरच्या फाट्यापासून १ किमी लांब अंतरावर हे मारुतीचे देऊळ आहे. अकरा मारुती मध्ये सर्वात पहिली ह्या मारुतीची समर्थांनी स्थापना केली होती.
९) बहे बोरगाव चा मारुती -
सांगली जिल्ह्यांतील वाळवे तालु्यातील बहे नावाच्या गावाजवळ बोरगाव आहे, म्हणून ह्या मारुतीला बहे बोरगाव चा मारुती असे देखील म्हटले जाते. ही मुर्ती पाण्यात एका बेटावर असून पावसाळ्यात पुर आल्यावर तेथे जाणे शक्य होत नाही.
१०) मनपाडलेचा मारुती -
ह्या मारुतीला पाडले मारुती असे ही म्हटले जाते. वारणेच्या खोऱ्यात असलेल्या
मनपाडले ह्या गावाच्या जवळ पाडले गावात ह्या मारुतीची मुर्ती आहे. ही मुर्ती तशी साधी आणि सुबक आहे. मुर्ती जवळ दीड फूट उंच कुबडी ठेवली आहे. हे ओढ्याकाठी असलेले कौलारू मंदिर आहे.
११) पारगाव चा मारुती -
ह्या मारुतीला समर्थांच्या झोळीतला मारुती असं देखील म्हतल जाते. कऱ्हाड कोल्हापूर रस्त्यावर वाठार गावाजवळ ही मारुतीची मुर्ती आहे. अकरा मारुती पैकी शेवटचा आणि लहान अशी सपाट दगडावर कोरलेली ही मुर्ती आहे. शके १५७४ म्हणजे इ.स. १६५३ साली स्थापना केलेला हा मारूती अकरा मारुती पैकी सर्वात शेवटी स्थापना केलेला मारुती आहे.
इ.स. १६४५ ते १६५५ अश्या १० वर्षांच्या काळात समर्थ रामदास स्वामींनी अकरा मारुती ची स्थापना केली आहे.
मित्रांनो जर महिती आवडली "Akara Maruti in Maharashtra Marathi" असेल व तुमच्या कामाची असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.
0 Comments
सदर website ही पर्सनल website असून त्यावर कोणतीही scam comments स्वीकारली जाणार नाही.
कृपया तुमची स्वतःची पर्सनल माहिती comments मध्ये करू नये. जर काहीही scam झाल्यास त्याचा website शी काहीही संबंध नसेल.