रवळी रेसीपी | गावाचा पारंपरिक पदार्थ रवळी | तांदळाचा गोड पदार्थ | Ravali Recipe in Marathi | Ravali mhanje Kay?

Ravali Recipe in Marathi रवळी रेसीपी | गावाचा पारंपरिक पदार्थ रवळी | तांदळाचा गोड पदार्थ.'Ravali mhanje Kay?'

Ravali Recipe Marathi
Ravali Recipe Marathi

रवळी रेसीपी | गावाचा पारंपरिक पदार्थ रवळी | तांदळाचा गोड पदार्थ | Ravali Recipe in Marathi | Ravali mhanje Kay?


मित्रांनो आजच्या नविन पिढीला पिझा आणि बर्गर ह्यांसारख्या फास्ट फूडशिवाय दुसरे पदर्थ माहीतसुद्धा नसतील. त्यामुळे गावाचे पदार्थ आणि त्याची चव हे त्यांना समजणे कठीण आहे."ravali recipe marathi"

असाच एक गावाचा पारंपरिक पदार्थ आज आपण बघणार आहोत. 

रवळी! कित्तेक जन्नना हे नाव नवीन असेल परंतु त्याची चव जर तुम्हांला जाणून घ्यायची असेल तर एकदा हा पदार्थ बनऊन बघा. घरात असणाऱ्या सर्व साहित्यापासूनच हा पदार्थ बनवता येईल.'kokani recipe'


रवळी म्हणजे नक्की काय?

हाच प्रश्न तुम्हाला आता पडला असेल. तो कसा बनवतात हे पण तुम्हाला जाऊन घ्यायचं असेल ना.'Ravali mhanje Kay?'


तर रवळी हा पदार्थ तांदळापासून बनवला जातो. एक प्रकारची गावाकडची गोड मिठाई म्हणायला हरकत नाही. पूर्वीच्या काळात गरिबीचे दिवस असल्यामुळे गावात सोप्पा आणि चविष्ट पदार्थ म्हणून रवळी बनवली जायची. हा पदार्थ बनवायला जास्त साहित्याची सुध्दा गरज नसते प्रत्येक घरात ह्या रेसीपी चे साहित्य असते. त्यामुळे पूर्वी हा पदार्थ प्रत्येक घरी बनवला जायचा."ravali recipe marathi"


शेतीची कामं झाली की शेतातल्या मजुरांना मिठाई म्हणून हा पदार्थ देण्याची गावात प्रथा होती. बदलत्या जीवनशैलीमुळे आता ही प्रथा फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळते."kokani padarth"


आता आपण हा पदार्थ कसा बनवायचा त्याची साहित्य आणि कृति बघुया.


साहित्य : 

१. तांदूळ २ वाटी 

२. साखर किंवा गूळ २ वाटी 

३. वेलची चवीप्रमाणे 

४. ड्राय फ्रूट्स ऑप्शनल 

५. १ नारळ 

६. दोन चमचे साजूक तूप 


कृति : 

१) प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावे. त्यांनतर मंद आचेवर लालसर भाजून घ्यावे. भाजून झालेले तांदूळ मिक्सर मध्ये बारीक रवा होईपर्यंत फिरऊन घ्यावे. तांदळाचे पीठ होता कामा नये. बारीक रवा होईल येवढाच मिक्सर फिरून घ्यावा.


२) नारळाचा किस करून घ्यावा. वेलची ची पूड असेल तर घ्यावी नसेल तर वेलची सोलून बारीक करून घ्यावी.


३) नंतर पातेल्यात जर दोन वाटी तांदूळ असल्यास ४ वाटी पाणी घ्यावे. पाण्याला छान उकळी आली की त्यात दोन चमचे साजूक तूप असल्यास घालावे. २ वाटी साखर घालून, वेलची पूड व जर ड्राय फ्रुट्स असल्यास घालावेत. 'sweet marathi'


४) त्यानंतर नारळाचा कीस घालून तांदळाचा बारीक रवा घालावा. छान खमंग शिजऊन घ्यावे. चवीपुरते मिठ घालून मिश्रण निट ढवळून घ्यावं. २५ ते ३० मिनिटे मंद आचेवर शिजवावे.'रवळी रेसीपी'


५) २५ टे ३० मिनिटे झाल्यावर गॅस बंद करून मिश्रण साधारण ८ ते १० तास थंड करत ठेवावे. छान घट्ट झालेले मिश्रणाच्या चौकोनी कापा करुन घ्याव्या. रवळी तयार.

खूप छान पदार्थ आहे. नक्की करुन बघा. धन्यवाद.'god padarth'


रेसीपी "ravali recipe marathi"आवडली असेल तर शेअर करा. आणि रवळी घरी बनवायला विसरू नका.


धन्यवाद.
 

Post a Comment

0 Comments