नवरदेवाचे गमतीशीर उखाणे | मराठी उखाणे | गावाकडचे उखाणे | Marathi Ukhane

 Marathi Ukhane नवरदेवाचे गमतीशीर उखाणे | मराठी उखाणे | गावाकडचे उखाणे.

Marathi Ukhane
Marathi Ukhane


मित्रांनो सध्या चा काळात उखाणे म्हटलं की नवीन ट्रेंड आला आहे. प्रत्येक कार्यात, लग्नात, सत्यनारायण पुजा अश्या विविध कार्यक्रम प्रसंगी उखाण्याची परंपरा आजही टिकून राहिली आहे. बघायला गेला तर उखाण्यांची नवीन फॅशन झाली आहे.'Marathi Ukhane'

Marathi Ukhane 

नवऱ्याचे शानदार उखाणे'Marathi Ukhane'

१) घ्यायची होती BMW पण घेतली मी Audy, ( २ वेळा)
.......... शी लग्न केलं आता लवकरच होईल माझी Death Body.


२) आंब्याच्या झाडावर बसला होता पक्ष्यांचा थवा, ( २ वेळा)
.......... ला दाखवतो मी आता माझी हवा.


३) शेताच्या बांधावर लावला होता वाल, ( २ वेळा)
.......... शी केलंय लग्न आता माझे होतील जीवाचे हाल.

४) नदीच्या किनारी होती जाई,
जाईला कळ्या होत्या पन्नास ( २ वेळा )
........... च नाव घेऊन सांगतो,
आता खऱ्या अर्थाने होईल माझा ऱ्हास.


५) आंब्यात आंबा हापूस आंबा, ( २ वेळा )
.......... तूच माझी पार्वती आणि जगदंबा.


६) गोव्याच्या किनाऱ्यावर केली होती दारु पार्टी, ( २ वेळा )
.......... आली घरात आणि झाला माझा काळ दर्टी


७) लहानपणी आई बोलायची बाळा आणि  ताई बोलायची बाबू,( २ वेळा )
.......... ला आणलय मी घरात पाठीला लावायला शाबु.


८) शाळेपासून होती Crush ती झाली माझी आज बायको, ( २ वेळा )
.......... ला माहीत आहे मी दारु पितो
मग दरनेका कायको.


९) जास्वंदी च्या फुलाला पाच पाकळ्या, ( २ वेळा )
.......... चा भावांनी माझ्या दारूच्या बाटल्या ढापल्या.


१०) कॅरम च्या खेळात आहे क्वीन आणि कवर, ( २ वेळा )
.......... च नाव घेऊन सांगतो बाहेरची कोणी नसेल आता माझी लवर.

११) आज आहे Sunday म्हणून केला मटणाचा रस्सा, (२ वेळा )
.......... शी झालं माझं लग्न आता बोंबलत बस्सा.


 १२) मैत्री चा नातं बदललं प्रेमात, ( २ वेळा )
.......... शी करुन संसार गेलो मी कोमात.


१३) ........... ह्या गावात खेळत होतो मी क्रिकेट, (२ वेळा)
तिथून आली .......... आणि पडली माझी विकेट.


१४) शहरात लग्न झालं पण शेवटी आलो आम्ही गावात, (२ वेळा)
.......... ला घेऊन जातो मी आता उसाच्या शेतात.


१५) सासूने केला होता शिरा
लांबून दिसत होता खूप गोड, (२ वेळा)
.......... ने पहिला घास भरवला
एवढा गरम होता की जिभेला आले फोड.

१६) कोकणातला देवगड चा फेमस आहे हापूस, (२ वेळा)
.......... ला सांगतो आता खड्यात गेला तुझा बापुस.

१७) ऊसापासून बनवतात गूळ आणि साखर, (२ वेळा)
.......... आहे माझी माकडीन मी तिचा वानर.

१८) गेलो होतो बाजारात आणली होती दारूची बाटली,(२ वेळा)
.......... च नाव घेतो घरी आल्यावर तीने कानाखाली मारली.


१९) लग्नाच्या आधी .......... म्हणायची मला राजा, ( २ वेळा)
काय सांगु राव लग्न झालं आणि आता वाजतोय माझा बेंडबाजा.

२०) लग्नात आणला मी सिंगर पेरमेश माळी, (२ वेळा)
देवा! .......... शी लग्न केलं आता झालं माझा विनायक माळी.

मित्रांनो 'Marathi Ukhane'उखाणे आवडले असतील तर शेअर करा तुमच्या जवळच्या मित्राला.
धन्यवाद.




Post a Comment

0 Comments