महालक्ष्मी जत्रा डहाणू | पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा | Mahalakshmi Yatra Dahanu | Maharashtra Famous Yatra

 Maharashtra Famous Yatra महालक्ष्मी जत्रा डहाणू | पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा | "Mahalakshmi Yatra Dahanu"

Mahalakshmi Yatra Dahanu
Mahalakshmi Yatra Dahanu


महालक्ष्मी जत्रा डहाणू ,पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा 


मित्रानो दरवर्षी चैत्र महिना लागताच महाराष्ट्रात जत्रा परंपरेला सुरुवात होते. महाराष्ट्रात ठिकठिकाणी यात्रा सुरू होतात. एक दिवस, दोन दिवस , तीन दिवस आणि पंधरा दिवस पण यात्रा चालतात.'mahalakshmi jatra'


अशीच एक पंधरा दिवसांची जत्रा म्हणजे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी येथील जत्रा. दरवर्षी हनुमान जयंती पासून ह्या यात्रेला सुरुवात होते. सलग पंधरा दिवस ही जत्रा चालते. 'mahalakshmi devi'

ही जत्रा म्हणजे एक वेगळीच मज्जा असते. पालघर च्या विविध भागातील लोक ह्या जत्रेत जात असतात. जत्रेत वेगवेगळ्या प्रकारची दुकाने आपल्याला बघायला मिळतील. आकाश पाळणे, सर्कस, जादूचे खेळ, मौत का कुआ अश्या विविध राईड्स जत्रेची शोभा वाढवतात. 'Maharashtra Famous Yatra'आकाश पाळण्यात बसल्यावर वरून आपल्याला संपूर्ण जत्रेचे रूप बघायला मिळते. 

ह्या जत्रेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथिल चिकन भुजिंग. येथे चिकन भूजिंग चे वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील. पालघर च्या लोकांची अशी प्रथाच झालेय की महालक्ष्मी जत्रेत गेल्यावर भूजिंग खाल्याशिवाय कोण परत जात नाही. प्रत्येक जण यात्रेत फिरून झाल्यावर भूजिंग घेतात आणि नंतर जत्रेचा निरोप घेतात.'yatra'


ह्या जत्रेत गेल्यावर खूप प्रकारची दुकान आपल्याला दिसतील. अगदी संसारात लागणाऱ्या वस्तूंपासून ते सोभेच्या वस्तूपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला येथे भेटतात. खाण्या पिण्याचे तर सर्व प्रकार दिसतील. 


महालक्ष्मची जत्रा ही पालघर जिल्ह्यातील आदिवासी लोकांसाठी खूप महत्त्वाची जत्रा असते. कारण डहाणू तालुक्यात आदिवासी वस्ती जास्त प्रमाणात आहे. महालक्ष्मी तेथे स्थाईक लोकांना रोजगाराची चांगली संधी या जत्रेत असते. येथिल आदिवासीं लोक जत्रेत विविध प्रकारची दुकाने लावतात. या पंधरा दिवसांच्या काळात चांगली कमाई होत असते. 'Maharashtra Famous Yatra'

  

महालक्ष्मी ह्या मातेची एक आख्यायिका सांगितली जाते.

कोल्हापूरची महालक्ष्मी देवी गुजरात कडे जात असताना डहाणू येथील तिला परिसर खूप आवडला. हिरवगार निसर्ग देवीला खूप मोह पाडत होता. म्हणून देवी ह्या ठिकाणी असलेल्या डोंगरावर वस्ती राहिली होती. देवीने या ठिकाणी सुमारे पंधरा दिवसांचा मुक्काम केला होता. म्हणून आज येथे पंधरा दिवस जत्रा भरत असते. "sunder maharashtra"


पालघर मधिल ह्या जत्रेचा आनंद घेण्यासाठी एकदा येथे येऊन बघा. मुंबई-अहमदाबाद ह्या राष्ट्रीय महामार्गावरच ही जत्रा असते.'jatra'


माहिती "Mahalakshmi Yatra Dahanu"आवडली असेल तर शेअर करा.

धन्यवाद.



Post a Comment

0 Comments