जांभूळ गाव | पालघर मधले जांभूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव | बहाडोली गाव | Jambhul Famous Village in Maharashtra

Jambhul Famous Village in Maharashtra जांभूळ गाव | पालघर मधले जांभूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव | बहाडोली गाव |

Jambhul Famous Village in Maharashatra
Jambhul Famous Village in Maharashatra


मित्रांनो तुम्हाला जांभूळ खायला आवडतात का?

आयुर्वेदात जांभूळ हे मधुमेह नियंत्रणासाठी खूप फायदेशीर मानले जाते. यासोबतच पचन सुधारण्यासाठी आणि किडनी स्टोनवर देखील जांभळाचा उपचार म्हणून वापर केला जातो. जांभळामध्ये लोह, कॅल्शियम, प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात. प्रौढांसोबतच हे फळ मुलांच्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. 'Maharashatratil Famous Jambhul'


पालघर मधले जांभूळ उत्पादनासाठी प्रसिद्ध गाव

जांभूळ गाव

असे हे जांभुळ फळ पालघर मधील बहाडोली या गावात खूप मोठ्या प्रमाणात पिक घेतले जाते. जांभुळ उत्पादन हा येथील शेतकऱ्यांचा सिजानल व्यवसाय आहे. 'Jambhul Famous Village in Maharashtra'

येथील प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात जांभळाचे झाड तुम्हाला बघायला मिळेल.


साधाणपणे एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या कालावधीत जांभळाचे उत्पन्न होते. पण येथील शेतकरी हे जानेवारी पासूनच झाडांचे संगोपन करायला सुरवात करतात. झाडाला फुल यायचा आधीच ते झाडाला सर्व बाजूंनी बांबू ची माची बांधतात. जेणेकरून झाडाला फळ आल की ते तोडण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागु नये म्हणून माची बांधली जाते.


आता तुम्हाला प्रश्न पडला असेल माची म्हणजे काय? माची कशी बाधतात?

तर माची म्हणजे झाडाच्या सर्व बाजूने बांबू लाऊन त्यावर उभे राहून सहजतेने फळ तोडता यवे अश्या रीतीने बांबूचे एकमेकांना बाधून एक स्ट्रक्चर तयार केलेले असते त्याला माची असे म्हणतात.


साधारण पणे एप्रिल महिन्याच्या सुरवातीला हे जांभळाचे फळ पिकायला सुरुवात होते.आणि या गावाच्या शेतकऱ्याचे जांभुळ विक्री चालु होते.'Jambhalache zad'


२० वर्षापूर्वी बहाडोली गावाला जांभुळगाव असे नाव होते. पण कालांतराने ते नाव बदलून बहाडोली असे करण्यात आले.


येथील शेतकरी हे २ ते अडीच महिन्यामध्ये एका झाडापासून कमीत कमी ६० ते ७० हजार रुपयांचा नफा कमवतात. प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात ५० ते ६० जांभळाची झाडे आहेत. जांभूळ उत्पादन हा त्यांचा सिजनल व्यवसाय असून बदलत्या हवामान नुसार येथे शेती केली जाते. भात शेती हा पालघर जिल्ह्यातील प्रमुख व्यवसाय असून प्रत्येक सिजान मध्ये येथे वेगवेगळी शेती केली जाते. 'Jambhalachi sheti in maharashtra marathi'


येथील जांभूळ हे मुंबई सारख्या मोठ्या शहरात देखील निर्यात केले जाते. 

जांभळाची साइज देखील इतर ठिकाणी होणाऱ्या फळापेक्ष्या खूप मोठी असते, आणि चवीलाही एकदम गोड असतात."palaghar madhil jambul sheti"


मे महिना संपत आला की येथील शेतकरी जांभूळ सुकवायला सुरुवात करतात. हवेमुळे जी जांभळ खाली पडलेली असतात ती येथे सुकवली जातात, आणि स्टॉक ला ठेवली जातात. पावसाळा सुरू झाल्यावर त्याच्या पासून मद्य निर्मिती केली जाते. आणि त्याला बाजारात खूप मागणी असते. जांभळाची दारु खुप प्रसिद्ध आहे. 


पावसाळ्यात येथे जांभळाचे रोप तयार केले जातात. नाशिक सारख्या ठिकाणी येथील रोपांना खूप मागणी आहे. बहाडोली हे पालघर मधील जांभूळ उत्पादनात एक नंबर आहे.


"Jambhul Famous Village in Maharashatra"

मित्रांनो जर तुम्हाला जांभूळ फळाची महिती आवडली असेल व तुमच्या कामाची असेल तर शेअर करायला विसरू नका.


धन्यवाद.


Post a Comment

0 Comments